Bear and Bull Trading strategy by vision awareness

0

Bull trap and Bear trap म्हणजे काय?

नमस्कार मित्रांनो कसे आहात सर्व कशी चालू आहे तुमची trading, चांगली आहे ना. पैसे बनतात ना? कारण की सध्या sideways market Trend आहे एका दिवशी positive तर दुसऱ्या दिवशी लगेच negative आपल्याला बघायला भेटत आहे. या मार्केटमध्ये stoploss घेऊनच काम करा कारण की आपली capital जपणं खूप जास्त महत्वाच आहे. 

मी आज अधिक माहिती पूर्ण ब्लॉक घेऊन आलो आहे तुमच्यासाठी Bull trap आणि Bear trap या टॉपिक वर. कदाचित तुम्हाला माहिती असेल ज्यांना माहिती आहे त्यांनी हा ब्लॉग दुसऱ्या सोबत शेअर करावा म्हणजे ज्यांना माहिती नाही त्यांना देखील Bull trap म्हणजे काय आणि Bear trap म्हणजे काय या बद्दल थोडीशी माहिती मिळून जाईल. 

Trap म्हणजे काय?

Trap म्हणजे काय तुम्हाला माहीत असेल trap म्हणजे काय पकडणे किंवा एखादं जाळं पसरवणे किंवा जाळं निर्माण करणे की त्यामध्ये कुणीतरी अडकला गेला पाहिजे. जस  आपण पक्षाला फसवण्यासाठी जसं जाळ तयार करतो. 

आता तुम्ही मला म्हणाल की हा पक्षी अडकवण्याचा आणि stock market चा काय संबंध आहे.
आपण समोर जे बघणार आहोत त्यामध्ये तुम्हाला कळेलच.

चला तर सर्वप्रथम आपण Bull trap बद्दल जाणून घेऊया.

Bull trap म्हणजे काय?

Bull trap म्हणजे तुम्हाला माहीतच आहे जेव्हा stock market मधे price सतत up आणि Down movement करत असते, त्यामध्ये ती अनेक वेळा support  किंवा Resistance level ब्रेक करत असते. कोणत्याही stock मध्ये जेव्हा वैशिष्ट्यपूर्ण uptrend असतो price सतत higher high आणि lower high बनवत चालते. 

हे सर्व चालू असताना price Resistance level break करते आणि वरती एक Bullish green candle बनवते. लोकांना वाटते की आता ह्या price ने resistance level break केला आहे आणि इथून price वरती जाईल. लोक पटापट trade madhe Entry घेतात. कोणी Stoploss लावतात तर कोणी लावत नाही. पहिली Green Bullish candle resistance level च्या वर clossing देते, आणि लगेच दुसरी Bearish Red candle त्या level च्या खाली previous Bullish candle च्या खाली low बनवते, price तिथून परत downtrend दर्शविते. 

या मधे जे trader's Bullish होते त्यांना trap मध्ये अडकवल गेले. यालाच आपण Bull trap म्हणतो. आता मला वाटते की तुम्हाला समजले असेल. ह्या trap मधे सर्वात जास्त Retail Trader's अटकतात.

Bear trap म्हणजे काय?

Bear trap म्हणजे Price जेव्हा downtrend मध्ये असते आणी वरून एखाद्या विशिष्ट support level वर येते. Support level vr आल्यावर एक Bearish Red candle बनवते आणि support level break करून त्याखाली clossing देते. परत trader कुठला vichar न करता trade madhe Entry घेतात त्यांना वाटते की price ने support level break केला. आता price इथून आणखी खाली जाईल. Pn त्यापुढील candle लगेच green Bullish candle बनून परत त्या support level वर closing देते. Price uptrend दर्शविते.

इथे जे trader's जास्त Bearish होते त्यांना अटकवल गेले म्हणुन याला Bear trap असे म्हणतात. 

खालील image मध्ये आपण बघु शकता,  price वरून खाली आली support level वर support घेतला आणि price वरती bounce झाली. परत price support level वर येऊन तिने support तोडला. पुढची Bullish green candle लगेच support level वर clossing देते. 

Bear and Bull Trading strategy by vision awareness

अपेक्षा आहे की तुम्हाला Bull trap आणि Bear trap समजलं असेल. Ata तुम्ही या गोष्टी पासून कस स्वतः ला वाचवू शकता ते aapn बघूया. 

अश्या वेळी trade घेतानी कुठल्या कुठल्या गोष्टीची काळजी घ्यावी.

  • ज्या वेळी तुम्हाला support किंवा resistance level break होताना दिसेल तर अगोदर price ला confirmation देऊ द्या की हा खरंच Breakout किंवा Breakdown आहे.
  • Confirmation झाल्यानंतर Risk management करणे आणि स्टॉप लॉस लावने खूप महत्त्वाचे आहे. 
  • Volume आणि volatility दर्शविणारे indicator वापरून तुम्ही confirmation करू शकता.
  • जेव्हां Price Resistance किंवा support break करते त्यावेळी volume आणि volatility हे दखील वाढलेली आसावेत. ते देखील तुम्हाला signal देते की Real break out ahe ki false break out. 

आपण Bull trading strategy and Bear Trading Strategy कशी वापरू शकतो. हा Blog वाचा.


एक टिप्पणी भेजें

0टिप्पणियाँ
एक टिप्पणी भेजें (0)

#buttons=(Accept !) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !