ट्रेडिंगमध्ये लॉस स्वीकारायला शिका.

ट्रेडिंगमध्ये लॉस स्वीकारायला शिका.

Trading without loss


जेव्हा लोक ट्रेडिंग करायचा विचार करता तेव्हा सर्वात मोठा प्रॉब्लेम त्यांना असतो की लॉस. बरोबर आहे कारण की ट्रेडिंग ही लॉस शिवाय होऊच शकत नाही. आणि लॉस पत्करणे हे सर्वांसाठीच कठीण असतं. पण हे शक्य नाही. हे म्हणजे असं झालं, तुम्हाला चालायचं तर आहे पण तुम्ही फक्त डावाच पाय वापरणार उजवा पाय वापरणार नाही. आता तुम्हीच मला सांगा तुमचं चालणं शक्य आहे. तसंच ट्रेडिंग ही लॉस शिवाय होऊ शकत नाही. 

जेव्हा त्यांना मार्केटमध्ये खरं ठरायच असतं तेव्हा त्यांना अडथळा जाणवत नाही. परंतु तुम्ही फोर्स करता की आता मार्केट वरती जाईल, आता मार्केट खाली जाईल तेव्हा मात्र नेमका गोंधळ उडतो. कारण मार्केट आपला ऐकत नाही. तर त्यामुळे मित्रांनो मार्केटला फॉलो करायला शिका. मार्केटमध्ये जी किंमत आहे, आपण प्राईज म्हणतो, तिला आधी सिद्ध करू द्या तिला जायचे कुठे. मग आपण जाऊन ना तिच्या पाठीमागे तिला फॉलो करत करत. 

जे मार्केटमध्ये प्रोफेशनल ट्रेडर आहेत त्यांनी त्यांची ट्रेडिंग एक वस्तुनिष्ठ पद्धतीने ठरवलेली असते. जर त्यांच्याविरुद्ध मार्केट जायला लागलं तर ते त्यांची पोझिशन कट करून घेतात आणि त्यांचं जे ट्रेडिंग कॅपिटल आहे आपल्या मराठी भाषेमध्ये "पैसा" वाचवतात. त्यांच्याकडे जेवढा पैसा आहे त्यापैकी फक्त 1% लॉस घेऊन ते बाहेर पडतात कारण त्यांना माहिती असतं जर मी आता 1% दिलं नाही तर मार्केट 10% सुद्धा घेऊन जाऊ शकतं. ते खुशी खुशी तेवढा लॉस करायला तयार असतात. ते मोजून मापून त्यांचा लॉस कमी करतात. तर हा एक रिस्क मॅनेजमेंट चा भाग आहे याबद्दल नक्कीच आपण नंतर एक वेगळा ब्लॉग लिहिणार आहोत.

लॉस झाल्याच्या नंतर प्रोफेशनल ट्रेडर त्याच गोष्टीचा विचार करत बसत नाही. त्यांना माहिती असतं की जे आपण प्रोसेस एक प्रणाली बनवली आहे, हा त्याचा एक भाग आहे. तुम्ही जर तुमच्या प्रत्येक लॉस सोबत जर झुंजत बसायचं ठरवलं तर तुम्ही मार्केटमध्ये जास्त काळ टिकू शकणार नाही. कारण की बहुतांशी तुम्ही स्वतः देखील हे निरीक्षण केलं असेल की जेव्हा तुम्ही मार्केट मध्ये लॉस रिकव्हर करायला जाता तेव्हा तुम्ही जास्त लॉस करून बसता. 

तुम्ही लॉस सोबत कसा संघर्ष करता हे मी माझ्या अनुभवावरून सांगतो. आपण कोणताही स्टॉक खरेदी करतो आणि त्या स्टॉक ची किंमत जेव्हा आपल्या विरुद्ध जायला लागते. आपण घाबरतो तेव्हा आपला लॉस ₹500 असतो. आपण तो लॉस बुक करत नाही आणि मनातच असं म्हणतो की आता हा स्टॉक वरती जाईल परंतु आता तुमचा लॉस ₹1000 होतो. आणि यापेक्षाही दुःखाची गोष्ट कोणती असते तुम्ही तो लॉस होतानी बघत असता. शेवटी तुमचा लॉस ₹2000 झाला. आता मात्र आपण सगळा दोष मार्केटला देणार की ते वर गेलं नाही. बरोबर आहे ना असंच होतं ना आपल्या सोबत. 

पण मित्रांनो मी तुम्हाला एक गोष्ट सांगू इच्छितो, की कोणत्याही स्टॉकमध्ये एन्ट्री घेणं हे आपल्या हातामध्ये असतं परंतु ते कोणत्या दिशेला जाईल हे आपल्या हातामध्ये नाही. जर स्टॉक तुमच्या दिशेने जात असेल तर त्याला जाऊ द्या तुमचं टार्गेट आल्यास तुम्ही निघून जा. जर मार्केट तुमच्या विरुद्ध दिशेने जात असेल तर छोटासा लॉस घेऊन निघून जा. हिंदीमध्ये एक कहावत आहे, " या तो उंगली काटो नहीं तो हाथ काटना पड़ेगा "। 

जर तुम्हाला नेहमी मार्केटमध्ये तोटाच होते तर तुम्ही स्वतःला हे प्रश्न विचारा. 

  • का? 
  • माझं काय चुकतं का? 
  • का माझी ट्रेडिंग Strategy बरोबर नाही? 
  • मी दुसऱ्याच ऐकून ट्रेड घेतोय का?
  • मी स्टॉक तर बरोबर निवडतोय ना?
  • माझी एन्ट्री चुकते का?
  • काय माझ्याकडे एक परफेक्ट risk management system आहे?

ह्या प्रश्नाचे उत्तर शोधा तुम्हाला नक्कीच फायदा होईल. हा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला हे आम्हाला सांगायला विसरू नका. कुठल्या गोष्टीवर तुम्हाला ब्लॉग वाचायला आवडेल हे आम्हाला कमेंट द्वारे नक्की कळवा. धन्यवाद.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या