Hot Posts

6/recent/ticker-posts

कामगारांसाठी आरोग्य विमा सेवा (ईएसआयएस)

राज्य कामगार विमा योजना

भारतीय राज्य कामगार विमा योजना ही कामगार वर्गाला सामाजिक आर्थिक सुरक्षितता पुरविण्यासाठी तयार केलेली बहुमुखी सामाजिक सुरक्षितता प्रणाली असून त्या अंतर्गत त्यांचे अवलंबित मुद्धा समाविष्ट आहेत. कामगारांना व त्यांच्या कुटुंबियांना नोकरीच्या पहिल्या दिवसापासूनच संपूर्ण वैद्यकीय देखभाली चरोवरच विमाधारक व्यक्तीचे आजारपण, तात्पुरते किंवा कायमचे अपंगत्व, इत्यादीमुळे कमाईच्या क्षमतेत झालेली घट व विमाधारक महिला विविध तव्हेचे टोख लाभ मिळण्यास पात्र असतात. औद्योगिक अपघात किंवा सेवेतील इजेमुळे किंवा व्यावसायिक जोखीमिमुळे मृत्यू पावणाऱ्या विमा धारक व्यक्तीवर अवलंबून असलेल्या कुटुंबियांना अवलंबित्व लाभ नावाने दरमहा निवृत्ती वेतन दिले जाते.

राज्य विमा योजनेचे वैशिष्ट्य असे की त्यातील अंशदान है वर्गणीदाराच्या क्षमतेवर अवलंबून कामगारांना देय असणाऱ्या वेतनाची ठराविक टक्केवाटीच्या स्वरूपात असते तट मिळणाटा सामाजिक सुरक्षिततेचा लाभ हा प्रत्येकाच्या गरजेनुसार कोणताही भेदभाव न करता दिला जातो.

योजनेविषयी

राज्य कामगार विमा अधिनियम 1948 अंतर्गत लागू करण्यात आलेली राज्य कामगार विमा योजना ही आटोग्य विमा योजनांची मातृयोजना आहे. सुरक्षिततेची भावना ही मनुष्य स्वभावात अनुस्युतच आहे. एकत्र कुटुंब पद्धती नष्ट होत चालल्यामुळे, औद्योगिकीकरण, व नागटीकरणामुळे आधुनिक काळात सुरक्षितता आवश्यक झाली आहे. 14 इस्पितळे, व 61 दवाखान्यांद्वारे राज्य कामगार विमा योजना कामगार वर्गाच्या सेवेत कार्यरत आहे

राज्य कामगार विमा योजना अधिनियम

राज्य कामगार विमा योजना अधिनियम 1948 मध्ये आजारपण, मातृत्व, तात्पुरत्या किंवा कायम स्वरुपाचे अपंगत्व, सेवेतील इजेमुळे होणारे मृत्यू व त्यामुळे कमविण्याच्या क्षमतेत होणारी घट यासारख्या आकस्मिक घटनांमध्ये कामगारांचे हितरक्षण करण्यासाठी सामाजिक सुरक्षा देणाटी सर्वसमावेशक योजना असावी अशी योजना होती. अधिनियामध्ये कामगार व त्यांच्या लगतच्या अवलंबीतांच्या वैद्यकीय देखभालीची हमी देण्यात आली आहे. अधिनियमाचा आधार घेऊन केंद्र सरकारने योजना प्रशासित करण्यासाठी राज्य कामगार विमा महामंडळाची स्थापना केली, त्यानंतर, ही योजना दिल्ली व कानपूर येथे 24 फेब्रुवारी 1952 टोजी प्रथम अंमलबजावणी करण्यात आली. या अधिनियमाने मालकांना मातृत्व लाभ अधिनियम 1961 आणि कामगार नुकसानभरपाई अधिनियम 1923 मधील बंधनातून मुक्त केले, कामगारांना देण्यात आलेले लाभ है आंतरराष्ट्रीय कामगार संघटनेच्या अभिसंधीशी सुसंगत आहेत.

  • वैद्यकीय देखभाल, वैयक्तिक खचविट कोणतीही कमाल वयर्यादा नसलेली प्राथमिक, दुय्यम, व तिय्यम वैद्यकीय देखभाल.
  • आजारपणाचा लाभ: 91 दिवस
  • विस्तारीत आजारपणाचा लाभ: 34 विशिष्ट आजारांसाठी 730 दिवस (दोन वर्षेपर्यंत)
  • मातृत्त्वाचा लाभः 84 दिवस 1 महिना (प्रसूति, गरोदरपण, मुदतीपूर्वी बाळाचा जन्म झाल्यास इत्यादी)
  • तात्पुरता अपंगत्व लाभ । कायमचे अपंगत्वः
  • लाभकमविण्याच्या क्षमतेत नुकसान झाल्याच्या प्रमाणात / अपंगत्व अस्तित्वात असेपर्यंत अवलंबिताचे लाभ विमित व्यक्तीचे निधन झाल्यास त्याच्या पत्नीला ती हयात असेपर्यंत / पुनर्विवाहित होईपर्यंत व कुटुंबियांना विवाह / वया संबंधी असलेल्या शर्तीनुसार
  • राजीव गांधी श्रमिक कल्याण योजना: कारखाना / आस्थापना बंद झाल्यावर किंवा कपातीमुळे किंवा सेवेतील इजेमुळे 40% पेक्षा कमी नसलेल्या कायमस्वरूपी अपंगत्वामुळे तो बेरोजगार झाल्यास एक वर्षा पर्यंत दैनंदिन सरासरी वेतनाच्या 50% पर्यंत
  • अपंग व्यक्तींना नियमित सेवेत घेणाऱ्या खासगी

क्षेत्रातील नियोक्त्यांना प्रोत्साहन ऊ 25000/- पर्यंत मासिक वेतन घेणाऱ्या अपंग व्यक्तीच्या नियोक्त्यांच्या अंशदान पहिल्या तीन वर्षासाठी केंद्र सरकार तर्फे देण्यात येईल. निवृत्त विमित व्यक्तींना वैद्यकीय देखभाल वार्षिक रु 120/- भरून राज्य कामगार विमा योजने अंतर्गत उपलब्ध असलेल्या वैद्यकीय सुविधा,

संपर्क:
मुख्य कार्यालयः
आयुक्त कार्यालय, राज्य कामगार विमा योजना, पंचदीप भवन, सहावा मजला, ना. म. जोशी मार्ग, लोअर परळ, मुंबई 400013022-24950819

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या